धारदार शस्त्रासह दंगा करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर परिसरात सन 2022 साली घडली होती. मागील तीन वर्षापासून गुंगारा देणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पोलिसांची अखेर अटक केली आहे.दत्तात्रय उर्फ दत्ता अर्जुन काशिद (वय 34, रा. अंबर नाथ मंदीरा शेजारी, तरवडी रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.