वाशिम: सेवा पंधरवडा उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा - तहसीलदार निलेश पळसकर यांचे आवाहन
Washim, Washim | Sep 14, 2025 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाशीमचे तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले आहे