हिंगणघाट: शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशताब्दी वर्षानिमित्त श्री विजयादशमी उत्सव साजरा:पथसंचलन करत देशभक्तीचा संदेश
हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशताब्दी वर्षानिमित्त आयोजित श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले होते. या वर्षीचा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरला, कारण संघाने आपल्या १०० वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा शताब्दी सोहळा साजरा केला. एक असा प्रवास ज्याने राष्ट्रभक्ती, संस्कार, संघटनशक्ती आणि समाजसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे असे मत आमदार समिरभाऊ कुणावर यांनी व्यक्त केले.य