पुसद: तालुक्यातील बेलोरा ते मांजर जवळा रोडवर चोरीची रेतीसह वाहन जप्त; दोघांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुसद तालुक्यातील बेलोरा ते मांजर जवळा रोडवर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती अवैधरित्या विनापरवाना चोरून वाहतूक करीत असताना कार्यवाही करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये रेतीसह वाहन असा एकूण सहा लाख 5 हजराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक संभाराव पोले यांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये 8 ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.