पवनी: २० वर्षांनंतर जिल्हा परिषद शाळेच्या '१९९० बॅच'चा अविस्मरणीय स्नेहमेळावा!
Pauni, Bhandara | Dec 15, 2025 जिल्हा परिषद शाळा, चिचाळ येथे १९९० च्या बॅचमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला पाचवा स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या या मित्रांनी आपापल्या संसारातून आणि नोकरी-धंद्यातून वेळ काढत एकत्र येत शालेय जीवनातील आठवणी ताज्या केल्या. सर्व जण आपले देहभान विसरून बालपणीचे विविध खेळ खेळत पुन्हा एकदा बालवयात रममाण झाले.