पातुर: चिखलगाव सर्कलमध्ये परिवर्तनवादी युवा संघटनेची रोजगार मोहीम यशस्वी; 100 युवकांना खात्रीशीर रोजगार
Patur, Akola | Nov 25, 2025 चिखलगाव सर्कलमध्ये परिवर्तनवादी युवा संघटनेची रोजगार मोहीम यशस्वी; 100 युवकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार चिखलगाव सर्कलमध्ये परिवर्तनवादी युवा संघटनेतर्फे रोजगार निवेदन मोहीम राबविण्यात आली. स्थानिक युवकांना रोजगारात 50% प्राधान्य देण्याची मागणी करत संघटनेने केडिया कॉट फायबर्स, सम्यक ग्रुपचे विविध उद्योग, निंबी मालोकार जिनिंग प्रेसिंग, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसह सात उद्योगांना निवेदन देऊन भेटी घेतल्या. या उपक्रमामुळे चिखलगाव सर्कलमधील 100 युवकांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणारं आहे.