आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर-: गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी गंगापूर उपसा सिंचन योजनेबाबत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत योजनेची सद्यस्थिती, रखडलेली कामे, निधी व पुढील टप्प्यांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना देण्यात आल्या.शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळावे, शेती उत्पादन वाढावे आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार आहे.