राहुरी: ब्राह्मणी शिवारामध्ये तब्बल ४५एकर ऊस जळून खाक,दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्याचे ९० लाखाहून अधिक नुकसान
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील टेंभी शिवारामधे आज सोमवारी दुपारच्या दरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तब्बल ४० ते ४५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचे सुमारे ९० लाखांहून अधिक मोठे नुकसान या परिसरात झाले आहे. किशोर खोसे यांच्या उसाच्या क्षेत्राजवळील विजेच्या ट्रांसफार्मर जवळ शाॅर्ट सर्किटने ही आगेचे लोळ उसाच्या शेञात पडल्याने हि आग लागली,बघता-बघता आगीने रुद्ररूप धारण करत संपूर्ण शिवारात या दागिने मोठे नुकसान झाले आहे.