लाखनी: पर्यावरण संवर्धनासाठी सरपंचांचा आगळा उपक्रम : वाढदिवशी वृक्षारोपणाचा संकल्प !
पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असल्याची जाणीव ठेवत लाखनी तालुक्यातील जेवणाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली विनायक बुरडे यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्या दरवर्षी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. या वर्षीही त्यांनी आपल्या जन्मदिनी गावाच्या हद्दीत विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.