पाथर्डी: पालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी गर्दी....,!
पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी घरपट्टी, नळपट्टी, थकबाकी नसलेला दाखला व शौचालय प्रमाणपत्रासाठी पालिका कार्यालयात मोठी गर्दी केली. निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने आणि आवश्यक कागदपत्रांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले. पहिल्या दिवशी नगर अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता.