विक्रमगड: स्वच्छता मोहिमेचे खासदारांच्या उपस्थितीत डहाणू येथे करण्यात आले आयोजन
पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी माझा किनारा माझी जबाबदारी अंतर्गत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. देशात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी डहाणू किनाऱ्याची साफसफाई करत स्वच्छता करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली.