खुलताबाद: चिखलातून अंत्ययात्रा: ताजनापुर गावात मृतदेह पोहोचवताना नागरिकांना नर्क अनुभवावा लागला, व्हिडिओ व्हायरल
खुलताबाद तालुक्यातील ताजनापुर गावात मंगळवारी एका महिलेच्या मृत्यूच्या अंत्ययात्रेत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गाव ते कब्रस्तान पर्यंतचा रस्ता चिखलमय झाल्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेण्यात आला आणि पाण्यातून वाट काढत कब्रस्तान पर्यंत पोहोचवावा लागला.काल तालुक्यात झालेल्या ढगफूटीसारख्या पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते, ज्यामुळे अंत्ययात्रेचा प्रवास अत्यंत कठीण ठरला. या दृश्याने स्थानिकांना “जीवन जगताना आले अनेक अडसर, मेल्यानंतर वाटले नव्हते मार्ग होईल खडतर”