यवतमाळ: सरन्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच संविधान चौकात निषेध
यवतमाळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे सरन्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा संविधान चौक यवतमाळ येते जाहीर निषेध करण्यात आला. राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रा.वसंत पुरके सोबत यवतमाळ चे आमदार मा.श्री.बाळासाहेब मांगुळकर, अॅड जयसिंग चव्हाण, अॅड सिमा तेलंगे,प्रमोदिनी रामटेके,आयुषी देशमुख, रमेश भिसनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होतें