दारव्हा: दारवा तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा ,बहुजन मुक्ती पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे दारव्हा तालुक्यातील कापूस, तूर आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने प्रति हेक्टरी १८,५०० रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही मदत जमा झालेली नाही.या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार दारव्हा यांच्या मार्फत दि. ३ नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले.