कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव सावंगी येथे धक्कादायक घटना घडली असून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत राजू जी मानकर (रा. मोहगाव सावंगी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकावर हल्ला करणारा आरोपी हा त्यांचाच सख्खा पुतण्या कार्तिक मानकर (वय १५ वर्षे, रा. मोहगाव सावंगी) असल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपी कार्तिक मानकर याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसर्पण केले.