मुळशी: बावधन परिसरात मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक
Mulshi, Pune | Oct 16, 2025 एका बहुराष्ट्रीय (मल्टीनॅशनल) कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ८ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बावधन परिसरात घटना घडली.याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.