धरणगाव: कारमधून गुरांची निर्दयतेने वाहतूक, पाळधी बायपासवर कारवाई; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास येथील वळणावर कारमधून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धरणगाव पोलीसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवारी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता केली. पोलीसांना पाहून चालक कार जागेवर सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.