मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथील गायमुख नाल्याजवळ दि. 25 डिसेंबर रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास भंडारा स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे यांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत सदर ट्रॅक्टर व त्यातील एक ब्रास रेती जप्त केला. याप्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक विशाल हिरामण शेंडे याच्याविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.