चिखली: काँग्रेस नेते डॉ. सतेंद्र भुसारी यांचे रेल्वे अपघातात निधन,कसारा घाट रेल्वेस्थानकानजीक वळणार रेल्वेतून पडून मूत्यू
चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती कॉंग्रेस चे नेते डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे काल (दि. १२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कासारा रेल्वेस्थानकानजीकच्या टर्निंग पॉइंटवर रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. भुसारी हे जालना येथून मुंबईकडे पक्षाच्या बैठकीसाठी जात असताना ही गाडी कासारा घाट रेल्वेस्थानकावर थांबत नसताना तरी देखील ते रेल्वेतून खाली पडले कसे याचा तपास सुरू आहे.