लाखनी: कोच्छी दांडेगाव येथे पथनाट्यातून जनजागृती ; नागरीकांचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद
कोच्छी दांडेगाव येथे सामाजिक जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. गावातील युवक मंडळाच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हे पथनाट्य सादर करण्यात आले. ही जनजागृती १५ सप्टेबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. सामाजिक व शैक्षणिक प्रश्न, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता अभियान तसेच सरकारी योजनांची माहिती या विषयांवर आधारित पथनाट्याद्वारे उपस्थित नागरिकांना संदेश देण्यात आला. कलाकारांनी प्रभावी अभिनय आणि प्रबोधनपर गाणी यांचा वापर केला.