शिरपूर: तालुक्यातील वरूळ परिसरातुन एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद
Shirpur, Dhule | Nov 1, 2025 शिरपूर तालुक्यातील वरूळ परिसरात एका गावातून १७ वर्षे ४ महिने २७ दिवसांची अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून,तिचे अपहरण झाल्याच्या संशयावरून शहर पोलिस ठाण्यात 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पीडित मुलीच्या ३९ वर्षीय वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तिचे 27 सप्टेंबर रात्री 9 ते 28 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान अपहरण झाल्याचा संशय आहे. पुढील तपास पीएसआय खैरणार हे करीत आहे.