अमळनेर: मांडळ येथे मावशीकडे आलेली गुजरातची तरूणी झाली बेपत्ता; मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
मावशीकडे भेटण्यासाठी आलेली गुजरात येथील २१ वर्षीय तरूणी ही अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातून सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.