उदगीर: नरभक्षक बनू नका,रक्षक बना,अभियान प्रमुख संजयकुमार कांबळेचा सरकारवर हल्ला बोल
Udgir, Latur | Oct 4, 2025 जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी येथे नापिकीला कंटाळून २८ वर्षीय शेतकरी मारोती संग्राम रायकवाडे यांनी ३ ऑक्टोबर रोजी गळफास लावून जीवन संपविले,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,४ ऑक्टोबर रोजी उदगीर येथील बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे यांनी बेळसांगवीत जाऊन रायकवाडे कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला,सरकारने नरभक्षक न बनता शेतकऱ्यांसाठी रक्षक बनून शेतकऱ्यांना मदत द्यावी, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका,तातडीने मदत द्यावी अशी मागणी करत सरकारवर हल्ला चढवला.