नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 करिता मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वत्र व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. स्वीप उपक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या माध्यमातून अनोखे उपक्रम राबविले जात आहेत. शनिवारी संध्याकाळी तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिक कुटुंबियांसमवेत मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडतात किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत वर्दळीच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या पथनाट्यांप्रमाणेच मॉल्समध्ये फ्लॅश मॉबसारख्या आधुनिक संगीतमय नृत्य प्रकारचाही प्रभावीपणे उपयोग करण्यात येत आहे. यामध्ये सीवूड येथील नेक्सस मॉल फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते.