शिरूर: मोटारीत गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्यांवर गुन्हा, शिक्रापूर मधील चाकण चौक परिसरातील घटना
Shirur, Pune | Nov 29, 2025 पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर)मधील चाकण चौक परिसरात गुरुवारी (ता. २७) रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून मोटारीमध्ये मोठ्याने गाणी लावून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तीन युवकांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.