हिंगणघाट: सावरखेडा गावात वाघाचा धुमाकूळ: मुरा जातीच वगार केले ठार, परिसरात भीतीचे वातावरण
वनक्षेत्रालगत असलेल्या सावरखेडा गावात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका वगराचा मृत्यू झाल्याची घटना उघडी आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सावरखेडा आणि आसपासच्या परिसरात वाघाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सावरखेडा येथील शेतकरी चंद्रशेखर किसनाजी थूटे यांचे मुरा जातीच ३ वर्षाच वगार गावाजवळच्या गोठ्याच्या बाहेर बांधलेले असताना वाघाने सकाळच्या सुमारास अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात वगराचा जागीच मृत्यू झाला.