वर्धा: बँक खातेदारांसाठी मोठी बातमी: दावा न केलेल्या ४३ कोटींच्या रकमा परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम
Wardha, Wardha | Nov 1, 2025 जिल्ह्यातील बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दावा न केलेल्या लाखो-करोडो रुपयांच्या रकमा मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसदारांना परत मिळवून देण्यासाठी एक विशेष मोहीम आज एक नोव्हेंबर रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. असे दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे