गोंडपिंपरी: वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांना आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
गोंडपिपरी तालुक्यातील मौजा गणेश पिपरी येथील अल्का पांडुरंग पेंदोर (वय_४५) या महिलेचा २६ ऑक्टोबर रोजी शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे पेंदोर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून शासनामार्फत १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मृत महिलेल्या कुटुंबीयांना करण्यात आले.