नेवासा: तो रस्ता गेला खड्ड्यात ; कुणीच लक्ष देत नसल्याने जनतेत नाराजी
नेवासा शहराशी जोडणाऱ्या खडका रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. सध्या खडका रस्ताच प्रवास खडतर बनला आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अंतरावर मलमपट्टी करून या रस्त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे. आता आ.विठ्ठलराव लंघे यांनी खडका रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.