हिंगणा: वाना डोंगरी परिसरात कचरा वेचताना वीजतार पकडल्याने युवकाचा मृत्यू
Hingna, Nagpur | Oct 19, 2025 झुडपात पडलेल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने कचरा गोळा करणाऱ्या एका अनोळखी युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटनादुपारी दोन वाजताच्या सुमारास वानाडोंगरी परिसरात घडली.मृतकाची अजून ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ३० वर्षे आहे. त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी होती. त्यात काही वायर व प्लास्टिक भरून होते. त्यामुळे या परिसरात तो कचरा गोळा करण्यासाठी आला असावा. या भागात गवत व झुडपे वाढलेली आहे. त्यात नेमका एक जिवंत वीजतार तुटून पडला होता.