साक्री: पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणावर लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे "केवळ शो पीस";गेल्या अनेक वर्षांपासून सीसीटीव्ही बंद
Sakri, Dhule | Nov 22, 2025 साक्री तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या लाटीपाडा धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने हजारो रुपये खर्च करून ‘तिसरा डोळा’ अर्थात, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत मात्र ते अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहेत.तर काही कॅमेऱ्यांचे अक्षरशः तोड-फोड करून नुकसान झाले आहे.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.लाटीपाडा धरणाच्या परिसरात सुटीच्या दिवसांत पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. यातील उत्साही तरुण-तरुणींकडून पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नाही. त्यामु