सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या अटितटीच्या लढाईत भाजपाच्या राणी कलोडे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत राणी कलोडे यांनी शरद पवार गटाच्या सुनीता कलोडे यांचा ११०० मतांनी पराभव केला. या निकालाची घोषणा रविवारी ता. २१ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बबिता आळंदे यांनी केली.