समुद्रपूर: नंदोरी परिसरातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करा
नंदोरी परिसरातील गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करण्याकरिताप्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात आज सोमवारी ३ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, आदि उपस्थित होते.