समुद्रपूर: वाकसूर शिवारातील वणा नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल, ५७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर:तालुक्यातील वाकसुर शिवारातील वणा नदी पत्रातुन अवैध रित्या जे.सी.बी.च्या साहाय्याने ट्रक्टरांमध्ये काळी रेती भरून चोरून वाहतुक करणाऱ्या ७ आरोपी विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ५७ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला हि कारवाई पोलिसांनी रविवारी २ जुनं रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास केली असून पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर करीत आहे.