शिरूर: कोंढापुरी येथे एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, शिक्रापूर पोलीस ठाण्यात एसटी चालकावर गुन्हा दाखल
Shirur, Pune | Jun 21, 2025 पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी घडली. निवृत्ती सांडू मोकासे (वय ४६, रा.पिशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात एसटी चालक तुषार योगीराज बावीस्कर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.