चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वामनपल्ली येथील घटना
वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना बुधवारी वामनपल्ली येथे घडली असून परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. कक्ष क्रमांक 42 ला लागून असलेल्या काशीनाथ कोडापे यांच्या शेतशीवाराजवळ मधुकर गेडाम यांच्या मालकीच्या बैलावर हल्ला करून वाघाने ठार केले आहे. दरम्यान वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.