मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा बंदची सकल मराठा समाजाची हाक
Dharashiv, Dharavshiv | Sep 21, 2024
मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे,यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ दि.२१ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.यात अत्यावश्यक सेवा यांना या बंदमधून वगळण्यात आलेले आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपआपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे,असे आवाहन सकल मराठा समाजाचे सदस्य बलराज रणदिवे यांनी आज दि.20 सप्टेंबर सायं.8 वा.केले