बिजाईटोला येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते मराठी नाटकाचे उद्घाटन संपन्न झाले.मराठी रंगभूमीची परंपरा, कलाकारांची मेहनत आणि रसिक प्रेक्षकांचा उत्साह अनुभवण्याचा आनंद मिळाला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात कला, संस्कृती आणि संवाद अधिक समृद्ध होतो.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कलाकार, आयोजक व उपस्थित रसिकांचे मनापासून अभिनंदन असे याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले म्हणाले.