राहाता: शिर्डीत भाविकांची ऑनलाईन फसवणूक,पोलिस ॲक्शन मोडवर...!
शनि शिंगणापूर नंतर आता शिरडी साई संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाइट बनवून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी साईबाबा संस्थांना स्वतः पुढाकार घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. साई दर्शनासाठी महर्षाकाठी करोडो तर दररोज हजारो भाविक शिरडीत येत असतात. अनेक भाविक वास्तव्यासाठी साई संस्थांच्या भक्त निवासा ला प्राधान्य देतात. असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थांच्या ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन रूम बुकिंग करतात.