खेड: समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Khed, Pune | Sep 15, 2025 समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते.