कन्नड: नेत्यांनी पैसे खर्च करा आणि निवडून या” मंत्री पाटीलांचा वक्तव्यावर गजानन गवळींची तीव्र टीका
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या “लोकशाहीतील महत्त्वाची निवडणूक आहे, नेत्यांनी पैसे खर्च करा आणि निवडून या” या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले, “जनतेच्या पैशावर नेते ऐश करतात आणि आता पैशाने मतं मागतात, हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.