राधानगरी: नरतवडे येथे अजित पवार गट राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा, पालकमंत्री हसन मुश्रीफ व के.पी. पाटील यांचे मार्गदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार दुपारी २ वाजता नरतवडे येथे पार पडला. या मेळाव्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार के.पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी काही आरोप केले होते, त्याचा समाचार रविवारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला. ए.वाय. पाटील यांनी बिद्री कारखान्याचे वेळी माझा विश्वासघात करून विरोधी पॅनलमध्ये गेले, आता स्वतः त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.