अंबरनाथ: बदलापूर येथे दुचाकीवर परप्रांतीयांचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा मराठी एकीकरण समितीचा आरोप
बदलापूर येथे परप्रांतीयांकडून बेकायदेशीरपणे वाहनांवर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास मराठी एकीकरण समितीच्या वतीने एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सदर परप्रांतीय व्यक्ती दुचाकीवर खुर्च्या विकत असल्याच समोर आल असून त्या दुचाकीला नंबर प्लेट देखील नसल्याचं दिसून आल आहे.