त्र्यंबकेश्वर: कुशावर्त गंगा गोदावरी मंदिरात नवरात्री निमित्त 108 महिलांचे सामूहिक श्रीसुक्त पठण पडले पार
नवरात्र उत्सव 108 महिलांकडून श्री सूक्त पठण. त्र्यंबकेश्वर ता.27 सप्टेंबर 2025 तीर्थराज कुशावर्त चौक महिला मंडळ यांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमात नवरात्रोत्सवानिमित्ताने येथील महिलांनी सामूहिक श्रीसूक्त पाठ केला पठण केले. नगरीतील 108 महिला सहभागी झाल्या होत्या. येथील गंगा गोदावरी मंदिरात हा कार्यक्रम झाला. कुशावर्त तीर्थ येथे गोदावरी मंदिर आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री सूक्त पठण झाले. त्रंबकेश्वर येथील नवदुर्गा मंदिरात तसेच नवरात्र उत्सव मंडळ येथे अष्टमी नवमीला होम हवन होणार आहे.