बुलढाणा: शहरातील लक्ष्मी नगर येथील 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती हरविला
बुलढाणा शहरातील लक्ष्मी नगर येथील 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती 2 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.बुलढाणा शहरातील लक्ष्मी नगर येथील भगवान सिताराम वाघ हा 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती कोणाला काही न सांगता हरविला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.