शेवगाव: शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल दीड कोटींची फसवणूक. शेवगाव पोलिसांकडून दोन आरोपिंना बेड्या...
शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक. दोन फरार आरोपींना शेवगाव पोलिसांनी केले जेरबंद. सदर आरोपी गेल्या एक वर्षापासून फरार होते. निलेश केसभट राहणार शेवगाव यांच्या फिर्यादीवरून बी. के. ट्रेडिंग अँड इनव्हेस्टमेंट या नावाने कंपनी सुरू करून फिर्यादीसह, इतर साक्षीदारांची सत्तावीस लाख पन्नास हजारांची फसवणूक करण्यात आल होती. या प्रकरणी १४ एप्रिल २०२५ रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी दिलीप केसभट राहणार शेवगाव हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.