पुणे शहर: खराडीत अट्टल घरफोड्याला जेरबंद करुन खराडी पोलिसांनी 3 गुन्ह्यातील साडेपाच लाखांचा ऐवज केला हस्तगत
Pune City, Pune | Sep 15, 2025 आपले घर सोसायटीमधील घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्याला खराडी पोलिसांनी जेरबंद करुन घरफोडीबरोबरच वाहनचोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ५ लाख ४० हजार ९७५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे असे या चोरट्याचे नाव आहे.