वाशिम: काटा रोडवरील आंब्याचे झाडांची कटाई, संबंधीत विभागने लक्ष देण्याची मागणी
Washim, Washim | Sep 14, 2025 शहरातील काटा रोडवर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ-मोठे आंब्याची डेरेदार झाडांची राजरोस कटाई करण्यात आल्याचे दि. 14 सप्टेंबर रोजी पहावयास मिळाले. शहरात दिवसें दिवस मोठ्या व डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याने झाडांची संख्या झपाट्याने घटून पर्यावरणास मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सदर प्रकाराकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी शहरवासींकडून होत आहे.