डिसेंबर महिन्यात तालुक्यातील तीन वेगवेगळ्या गावांमध्ये भरदिवसा घरफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांमध्ये अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. पीडितांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान, २६ डिसेंबर रोजी आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील रहिवासी भीमराज नेमीचंद मेश्राम (२७) याला अटक केली