गडचिरोली: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित
सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह एटापल्ली येथे तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली.जुन्या तालुका पत्रकार संघटनेचा कार्यकारणी कार्यकाल संपुष्टात आल्याने व नविन कार्यकारणी गठीत करण्याची आवश्यकता असल्याने लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.अध्यक्ष शेषराव नामदेवराव संगीडवार तर उपाध्यक्ष म्हणून जनार्धन नल्लावार,सचिव प्रशांत मंडल,सहसचिव राकेश तेलकुंटलवार,कोषाध्यक्ष तनुज बल्लेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.